Uddhav Thackeray | BJP
Uddhav Thackeray | BJPTeam Lokshahi

'गल्लीतलं कुत्र विचारत नव्हत या भाजपला' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

म्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तुम्ही मराठी माणसाच्या एकजूटीवर घाव घालत आहे.
Published by :
Sagar Pradhan

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची सभा झाली. यावेळी यासभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न करता. असा घणाघात त्यांनी भाजपवर केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जे शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करता मला त्यांना एक सांगायचे तुम्ही नेमकं काय करता? तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तुम्ही मराठी माणसाच्या एकजूटीवर घाव घालत आहे. हिंदुच्या एकजूटीवर घाव घालता आहात. जे हिंदुत्व उभे करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी अख्ख आयुष्य वेचले. जे हिंदुत्व आज उभे राहिल्यानंतर ज्यांनी तुम्हाला साथ सोबत दिली. अरे तुम्हाला कोण विचारत होत तुम्हाला गल्लीतल कुत्र विचारत नव्हत या भाजपला. अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

शिवसेना प्रमुख उभे राहिले नसते तर आज कुठे दिसले असते का? पण एवढ्या निष्ठुर पणे वागता ज्यांनी साथ दिली पहिले त्यांना संपवा अस करता बघा प्रयत्न करून. आज संजय कदम हे शेकडो लाखो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. होय मी शिवसेनाच म्हणणार कारण निवडणुक आयोगाचा निर्णय मला मान्य नाही. अजिबात नाही निवडणुक आयोग पक्ष चिन्ह नाव देऊ शकतो पण शिवसेना नाही. असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com