ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार

बोरिवलीत ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

बोरिवलीत ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर हा विनोद घोसाळकर यांचा मुलगा असून गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाले आहेत.  पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक घोसाळकर यांना दहीसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून संपवलं असल्याचं समोर आलं आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com