श्रीकांत शिंदेंची जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप; अदित्य ठाकरे म्हणाले...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. या निर्णयानंतर राजकीय वातावरण एकदमच तापले आहे. याच गदारोळ दरम्यान, आता ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. एकंदरच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही यांची काळजी पडली. एकीकडे अश्याप्रकारच्या धमक्या येतात तर दुसरीकडे विरोधीपक्षात असं सगळं सुरु आहे. गद्दार आमदारांनी अनेक वेळा मारहाण केली, शिवीगाळ केली, पोलीस स्टेशनमध्ये फायरींग केली. परंतु, त्यावर कुठेही कारवाई होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही. याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. अशी महत्वपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे.

काय केला राऊतांनी आरोप?
संजय राऊत यांनी यावेळी तीन पत्र लिहले आहे. एक पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर दुसरे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना लिहले आहे. पोलीस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात त्यांनी लिहले की, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे. असे राऊत पत्रात म्हंटले आहे.