Chandrashekhar Bawankule | Ambadas Danve
Chandrashekhar Bawankule | Ambadas DanveTeam Lokshahi

...मगच राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवावा, भाजपचा इशारा; ठाकरे गटाचे जोरदार प्रत्युत्तर, 'त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही'

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते दानवेंनी दिले प्रत्युत्तर.
Published by :
Sagar Pradhan

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र सावरकरांबद्दल वादग्रस्त विधानावरून प्रचंड वादंग सुरू आहे. हा सर्व वाद सुरू असताना राहुल गांधी हे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं आहेत. तशी बातमीसमोर येत आहे. परंतु राहुल गांधीच्या या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध होत आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र वीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून माफी मागवी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. आता भाजपच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule | Ambadas Danve
बिना बुद्धीचं बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार; शिवानी वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

काय दिले दानवेंनी प्रत्युत्तर?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात कोणी कोणाला येऊ देणार नाही, अशा गोष्टी करू नये. राहुल गांधी काश्मीर-श्रीनगरला जाऊन आले. मग, महाराष्ट्र काय काश्मीर-श्रीनगर आणि पाकिस्तानात नाही. महाराष्ट्रात कोणीही येऊ शकते. त्यामुळे भाजपाने याला येऊ देणार नाही, त्याला देणार नाही, अशी भाषा करू नये. जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही, असे जोरदार प्रत्युत्तर दानवेंनी दिले.

नेमका काय दिला होता बावनकुळेंनी इशारा?

'वीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाचवेळा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा' असा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com