Ambadas Danve
Ambadas DanveTeam Lokshahi

ठाकरे- आंबेडकर युतीवर दानवेंचे विधान; म्हणाले, एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये...

प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रात वैचारिक पातळी निर्माण केली. या दोघांचेही नातू एकत्र येत असतील, तर राजकारणचं नाही तर यात समाजकारणाकडंही लक्ष दिलं पाहिजे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात राजकीय गोंधळा दरम्यान ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिली बैठक झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यावरच आता ठाकरे गटानचे नेते अंबदास दानवे यांनी भाष्य केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये. असे ते माध्यमांना बोलताना म्हणाले आहे.

Ambadas Danve
ठाकरे गट- वंचित युतीवर शिंदे गटाची टीका; म्हणाले, जे कधी महापरिनिर्वाण दिनाला...

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनापासून एकत्र येत आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रात वैचारिक पातळी निर्माण केली. या दोघांचेही नातू एकत्र येत असतील, तर राजकारणचं नाही तर यात समाजकारणाकडंही लक्ष दिलं पाहिजे. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र आल्यास हे स्वागतार्ह पाऊल ठरू शकतं, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. यापूर्वीही शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलेली आहे. यात काही जणांनी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास सामाजिक-राजकीय दृष्टीनं चांगलं पाऊल ठरेल, अशी अपेक्षाही अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com