Bhaskar jadhav | Mohit Kamboj
Bhaskar jadhav | Mohit KambojTeam Lokshahi

कंबोज यांच्या आरोपांवर जाधवांचे जोरदार प्रत्त्युतर; म्हणाले, 100...

मी एकनाथ शिंदेंना 100 काय 5 फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गट आणि शिवसेना असा वाद उफाळून बाहेर येत आहे. त्यातच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गट नेते भास्कर जाधव यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यालाच आता भास्कर जाधव यांनी खरमरीत उत्तर देत मोहित कंबोज यांना आव्हान दिले आहे.

Bhaskar jadhav | Mohit Kamboj
अजित पवारांना फडणवीसांचे उत्तर; पोलीस फडणवीसांचे नाही तर महाराष्ट्राचे

काय दिले भास्कर जाधव यांनी आव्हान?

मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपाकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज 100 बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. देवेंद्र फडणवीस आता सुरुवातच झाली असेल तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी एकनाथ शिंदेंना 100 काय 5 फोन जरी लावले असले तरी मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन. असे जाधव म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे. अनाजीपंतांना सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव 100 उभे राहतील. तुम्ही एक आरोप सहन करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे. मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवाव. असे थेट प्रतिआव्हान जाधव यांनी कंबोज यांना दिले आहे.

Bhaskar jadhav | Mohit Kamboj
सत्यजित तांबेंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीचे कारणही केले स्पष्ट

काय केला होता कंबोज यांनी दावा?

मोहित कंबोज यांनी काल एक व्हिडीओ ट्वीट करत भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये ते म्हणाले की, गेल्यावर्षी जून 2022 मध्ये भास्कर जाधव यांनी किमान 100 वेळा शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं. यासोबतच अनेक मोठे गंभीर आरोप त्यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com