Chandrakant Khaire | Abdul Sattar
Chandrakant Khaire | Abdul SattarTeam Lokshahi

कृषीमंत्र्यांच्या सिल्लोडमध्ये तीन शेतकऱ्यांची आत्महत्या; खैरे म्हणाले, नैतिक...

त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातील तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. याची नैतिक जबाबदारी घेवून सत्तार यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत टाकले आहे. आधीच शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यातच दुसरीकडे अश्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या दुःखात भर टाकली आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडभरात सहा शेतकरी आत्महत्या केली, विशेष म्हणजे त्यातील तीन शेतकरी सिल्लोड मतदारसंघातील संघातील आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे देखील सिल्लोडचे असल्यामुळे त्यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Chandrakant Khaire | Abdul Sattar
"...त्यांनी बिहार मधील औरंगाबाद येथे जाऊन मरावं" केंद्रीय मंत्री कराडांची जलील यांच्यावर जोरदार टीका

काय आहे म्हणाले चंद्रकांत खैरे?

अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषीमंत्री आहेत, विशेष म्हणजे आपल्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आहेत. असे असतांना जिल्ह्यात आठवडभरात सहा शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातील तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. याची नैतिक जबाबदारी घेवून सत्तार यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातीलच तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे केवळ शेतकऱ्यांना वेळेवर मदत न करण्यामुळे घडत आहे. अब्दुल सत्तार यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खैरे यांनी केली.

खैरे यांनी आज कन्नड तालुक्यातील पिशोर, शफेपुर, भिलदरी, आंबा, उपळा, आदी गावांत जावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांचा त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी देखील खैरे यांनी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com