Thackeray Group | Shivani Wadettiwar
Thackeray Group | Shivani WadettiwarTeam Lokshahi

...आम्ही स्वस्थ बसणार नाही; शिवानी वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

वीर सावरकरांबद्दल कोणी, असं वक्तव्य केलं, असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील. राजन साळवींचे विधान.

निसार शेख | रत्नागिरी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वादग्रस्त विधानावरून सध्या प्रचंड वाद सुरू आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेस नेते विजय विडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Thackeray Group | Shivani Wadettiwar
उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा; महासोहळ्याची जय्यत तयारी

यासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील

शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून वाद सुरू असताना आता त्यांच्या याविधानावर बोलताना साळवी म्हणाले की, “वीर सावरकरांचं देशासाठीचं योगदान सांगण्याची आवश्यकता नाही. वीर सावरकरांची ख्याती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वीर सावरकरांबद्दल कोणी, असं वक्तव्य केलं, असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील. त्याप्रमाणे लढाई लढू,” असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या शिवानी वडेट्टीवार?

हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकांविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे विधान शिवानी वडेट्टीवार यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com