Sanjay Raut | Sharad Pawar
Sanjay Raut | Sharad PawarTeam Lokshahi

शरद पवार यांच्यामध्ये पक्ष उभी करण्याची ताकद- संजय राऊत

माझं सकाळचं बोलणं थांबवण्यापेक्षा तुम्ही ईडी आणि सीबीआयचा वापर थांबवा...

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. यावरून गोंधळ सुरू असताना आज शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एका वृत्तीवहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनील राऊत देखील होते. यावेळी या दोघांनी अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी मात्र संजय राऊत यांनी शरद पवारांच्या निवृत्तीवरून शंका व्यक्त केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शरद पवार यांच्या निवृत्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या नावाभोवती फिरत आहे. जस शिवसेना हा पक्ष ठाकरे नावाभोवती फिरतो. त्यामुळं पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा पक्षाला कमजोर करणारा निर्णय आहे. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांवर दबाव आणला जात आहे. अशात काही जण जातीलही सोडून. पण शरद पवार यांच्यामध्ये पक्ष उभी करण्याची ताकद आहे. बाळासाहेब ठाकरे असतानाही लोक सोडून गेले. यामध्ये छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील यांनी शिवसेना सोडली, पण पक्ष पुन्हा उभा राहिल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, माझं सकाळचं बोलणं थांबवण्यापेक्षा तुम्ही ईडी आणि सीबीआयचा वापर थांबवा. असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com