Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

'धनुष्यबाण रावणाच्या हाती शोभून दिसत नाही' ठाकरे गटाच्या नेत्यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेत आठ महिन्यांपूर्वी मोठी बंडखोरी झाली. या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटाकडून शिवसेना पक्षावर दावा करण्यात आला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे या ठाकरे गटातील नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यातच कसबा पोटनिवडणूक लागल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच वादादरम्यान आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेवणाचे बील कोटींच्या घरात, अजित पवार संतापले; म्हणाले, सोन्याचा अर्क...

काय केली देसाईंनी टीका?

ज्या प्रमाणे धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसते रावणाच्या हाती ते शोभून दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळाले असले तरी ते तुम्हाला शोभून दिसत नाही. अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, आताच्या राजकारणात तुम्ही जरी धनुष्यबाण घेऊन आला असला तरी, आता आम्ही मशाल घेऊन येऊ आणि त्या आमच्या मशालीने पळवून लावू आणि तुमची दाढीपण जाळून टाकू अशी जहरी टीका देसाई यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेमुळे शिवसेना आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com