Sushma Andhare | Amruta Fadnavis
Sushma Andhare | Amruta FadnavisTeam Lokshahi

अमृता को धमकी? किसकी औकात है? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोमणा

गृहमंत्र्याच्या घरामध्ये जर सुरक्षितता नसेल तर महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील? असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संबंधित एका घटनेवर विधानसभेत सवाल केला. यावर स्वतःहा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत घटनेचे माहिती दिली. मात्र, त्यानंतर राज्यात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी आता एकच टीकेची झोड करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना टोमणा मारला आहे.

Sushma Andhare | Amruta Fadnavis
रामदास कदमांची भास्कर जाधवांवर जहरी टीका; म्हणाले, जाधव म्हणजे बेईमान औ...

नेमकं काय म्हणाल्या अंधारे?

एका डिझायनर महिले सारखा त्रास दिला जात असल्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्या महिले विरोधात पोलिसात गुन्हा केला. त्यावरून आता गोंधळ सुरु असताना त्यावरच सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांना धमकी देण्याची कुणाची बरं ताकत असेल? गृहमंत्र्याच्या घरामध्ये जर सुरक्षितता नसेल तर महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील? असा सवाल त्यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी काही मुद्दे या घटनेच्या संदर्भाने सभागृहात मांडले आणि सभागृहातल्या सगळ्या सदस्यांचा लगेच विश्वास बसला. असा टोमणा देखील त्यांनी यावेळी मारला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. यावरुन सारखा त्रास दिला जात असल्याने अमृता फडणवीस यांनी डिझायनर महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हा मुद्दा विधानसभेत देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर हे सर्व प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com