Bachhu kadu
Bachhu kadu Team Lokshahi

आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, बच्च कडूंचा ठाकरेंना टोला

आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

Bachhu kadu
बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही, मंत्री देसाई यांचे विधान

नेमकं काय म्हणाले कडू?

मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले वेळात भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे असा टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते, तर जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते,सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती पण मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com