Nitin Deshmukh | Ravi Rana
Nitin Deshmukh | Ravi RanaTeam Lokshahi

राणांच्या टीकेला उत्तर देताना देशमुखांची जीभ घसरली; म्हणाले, त्याची पैदास...

एसीबीचा नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरला असे विधान आमदार रवी राणा यांनी केलं.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या राजकीय घडामोडी प्रचंड तीव्र झाल्या आहेत. त्यातच राजकीय मंडळींमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच दरम्यान काल ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीकडून नोटीस बजावण्यात आली. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. त्यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना यावर बोलताना आमदार रवी राणा यांनी आमदार नितीन देशमुख यांच्यावर टीका केली होती. त्यावरच प्रत्युत्तर देताना आता नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे.

Nitin Deshmukh | Ravi Rana
तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही, अजित पवारांचे पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर

नेमकं काय म्हणाले देशमुख?

रवि राणांच्या टीकेवर बोलताना देशमुख म्हणाले की, रवि राणा नेमका आहे कुठला?. त्याची पैदास कुठली? हेही महाराष्ट्रातील कुणाला माहिती नाहीये. रवी राणा हारामखोर आहेय. तो बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा आहे. मी त्याच्यासारखं बायकोच्या भरवशावर राजकारण करीत नाही. मतदारच आगामी निवडणुकीत राणाला त्याची जागा दाखवणार. बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार अन् त्यातून त्याला धडाही शिकवणार. असा इशाराच देशमुख यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले होते रवी राणा?

नितीन देशमुख यांच्या पापाचा घडा भरला आहे. जे उद्धव ठाकरेंनी पाप केले ते त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांना भोगव लागल. आणि जे जे लोक उद्धव ठाकरेंच्या पापामध्ये शामिल आहेत त्या सर्वांना नोटीसा येणार कारण हे कायदाचे राज्य आहे. हे एकनाथ शिंदे आणि देवेंद फडणवीस यांचे कायद्याने चालणारे राज्य आहे. जे उद्धव ठाकरेंच्या पापामध्ये शामिल आहे त्यांना भोगव पण लागेल आणि जेलमध्ये पण जावे लागेल. अशी टीका रवी राणा यांनी देशमुख यांच्यावर केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com