Narayan Rane
Narayan Rane Team Lokshahi

'शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणेंना मंत्रिपद' ठाकरे गटाच्या आमदाराची बोचरी टीका

धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असतानाच राणे कुटुंबाकडून नेहमी शिवसेना ठाकरे कुटुंबावर टीका करण्यात येते. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदावरून टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Narayan Rane
'चु** उद्धव ठाकरे...संज्या..' ठाकरे, राऊतांवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली

काय म्हणाले साळवी?

नारायण राणे यांच्यावर टीका करताना राजन साळवी म्हणाले की, राणे शिवसेनेमुळे ते मंत्री, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, त्या शिवसेनेला ते विसरले. कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. मात्र ते धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत अशी टीकाही राजन साळवी यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, नारायण राणे आज ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी असे जाहीर आव्हान राजन साळवी यांनी केले आहे. शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणे यांना मंत्रिपद दिले असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com