ठाकरे गटाला मोठा धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद

ठाकरे गटाला मोठा धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद

शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा यावरुन शिंदे व ठाकरे गटात चढाओढ सुरु आहे. अशातच ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे.

मुंबई : शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा यावरुन शिंदे ठाकरे गटात चढाओढ सुरु आहे. अशातच ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटांची तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यानं ती बाद ठरवण्यात आली आहेत. याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद
गणपतीत, मग नवरात्रीत अन् आता दिवाळीत फिरतायेत, काम... : आदित्य ठाकरे

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यावरुन उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले आहेत. हा संघर्ष सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आयोगानुसार शिंदे- ठाकरे गटाने पक्ष सदस्यात्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, ठाकरे गटांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने जवळपास 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगाने रद्द ठरवली आहेत. तर, उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र वैध ठरवली आहेत. यामुळे ठाकरे गट अडचणीत आला असून याचा शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या बोगस प्रतिज्ञा पत्रांचा तपासही आता पोलिसांनी सुरु केला आहे. ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरातून सादर केलेली प्रतिज्ञापत्र तपासणीसाठी मुंबईचे पथक कोल्हापूरात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ही सर्व शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला असून तक्रार दाखल केली होती. यानंतर आता या प्रकरणावर गुन्हे शाखा तपास करत आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण गोठविले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नवे चिन्ह व नाव दिले आहे. यानुसार उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आहे तर या ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. व शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं असून ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com