बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर ठाकरे-शिंदे सैनिक एकमेकांना भिडलं
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली आहे. परंतु, एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावरून निघताच ठाकरे गट आणि शिंदे गटाचे सैनिक एकमेकांना भिडलं आहे. यामध्ये पोलीस मध्यस्थी प्रयत्न करत आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी उद्या स्मृतिस्थळावर येणार असल्याने ठाकरे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद होऊ नये याकरीता एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळीच अभिवादन केले आहे. यानंतर शिंदे निघताच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अनिल देसाई तसेच इतर पदाधिकारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे-शिंदे गटाचे सैनिक एकमेकांसमोर आले असून जोरदार घोषणबाजी करण्यात येत आहे.