'या' दिवशी शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार

'या' दिवशी शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार

शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी वेळ आता ठरली आहे.

शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी वेळ आता ठरली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता ही सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट ) 40 आणि उबाटा 14 आमदारांची सुनावणी पार पडणार आहे.

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी असणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी घेणार आहेत.

वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदाराना आपलं म्हणणं मांडायला संधी दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com