राजकारण
India Alliance : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक 13 सप्टेंबरला
इंडिया आघाडीची पुढील बैठक 13 सप्टेंबरला होणार आहे.
इंडिया आघाडीची पुढील बैठक 13 सप्टेंबरला होणार आहे. संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला मात्र आता इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका पार पडणार नाहीत. शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी छोटेखानी बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सायंकाळी ५ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. : इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत झाली. संयुक्त विरोधी आघाडीची पहिली बैठक २३ जून रोजी पाटणा येथे तर दुसरी बैठक १७-१८ जुलै रोजी बेंगळुरू येथे पार पडली होती.