धक्कादायक! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने केली मारहाण

धक्कादायक! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने केली मारहाण

तुमसर तालुक्यातील सीता सावंगी येथील धक्कादायक घटना

उदय चक्रधर | भंडारा : शाळा संपल्यानंतर शाळेच्या वरांड्यात पायावर पाय ठेवून बसल्याच्या कारणावरून नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील सीता सावंगी येथे घडली. याविरोधात पालकांनी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयंक प्यारेलाल धारगावे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

धक्कादायक! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने केली मारहाण
सीमावादावरुन संसदेत खडाजंगी! सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल; महाराष्ट्राविरोधात षडयंत्र...

मयंक प्यारेलाल धारगावे हा शाळा संपल्यानंतर चिखला येथे जाण्याची बस लागलेली सूचना न मिळाल्याने वरांड्यात बसून होता. त्याच्यासोबत काही मित्र होते. दरम्यान शिक्षक मेश्राम तिथे आले व पाय सरळ ठेवून बसा, असे ओरडले. मात्र, शिक्षकाने मयंकला तुला समजत नाही का, तुला व्हिडीओ काढायची आवड आहे ना, मग आता व्हिडिओ बनव, असे म्हणत विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. मारहाणीतच मयंक बेशुद्ध होऊन पडला. थोड्या वेळात मुलाचे वडील प्यारेलाल यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मयंकला गोबरवाही आरोग्य केंद्रात दाखल केले.

दुर्गा उत्सवाच्या काळात ऑर्केस्ट्रा बघतांना मयंकने व्हिडिओ काढल्याचा राग शिक्षकाने मनात धरुन त्याला मारहाण केल्याचा आरोप मयंकचे वडील प्यारेलाल यांनी केला आहे. गोबरवाही ठाण्यात शिक्षकाविरुद्ध तक्रार देऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com