राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदारही दिसत नाहीत. काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांचं निलंबन केलंय.36 पेक्षा जास्त आमदार जर दुसऱ्या गटात आहेत हे सिद्ध झाल्यास अजितदादाच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागेल.
तसेच राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. अजितदादा गटाकडे 36 आमदारांचं संख्याबळ झालं नाहीत तर पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.