Eknath Khadse
Eknath Khadse Team Lokshahi

तर...'या' कारणामुळे खडसे संपर्क क्षेत्राच्या बाहेर

एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती आज समोर आली होती. मात्र याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा पाय दुखावला होता. त्यावरील उपचारासाठी तीन-चारदिवस मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार घेत होते.

Eknath Khadse
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे संपर्क क्षेत्राच्या बाहेर? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यावरच एकनाथ खडसे नेमके कुठे आहेत? याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

मात्र, खडसे यांचा अचानक पाय दुखायला लागल्यामुळे होता. पायाच्या उपचारासाठी मागील तीन ते चार दिवस मुंबईतील खासगी रूग्णालयात आहेत. त्यानंतर त्यांना रग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या ते घरी उपचार घेत आहेत. या कारणामुळे त्यांचा फोन बंद असून ते नॉट रिचेबल नव्हे तर घरी विश्रांती घेत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com