तुमचाही दाभोळकर करु; श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

तुमचाही दाभोळकर करु; श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिल्यानंतर धमक्यांचा सत्र सुरू

नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांना तुमचाही दाभोळकर करण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकी दिली गेली आहे. धिरेंद्र महाराज यांना आव्हान दिल्यानंतर धमक्यांचे सत्र सुरू झालं असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणं आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

तुमचाही दाभोळकर करु; श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी
शिवशक्ती-भीमशक्ती अखेर एकत्र! उध्दव ठाकरेंकडून युतीची घोषणा

श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु. तुम्हाला जीवाने मारू, अशा पद्धतीचे संदेश पाठवले जात आहे. याप्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसांमध्ये करण्यात आली आहे. यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिलं होतं. धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते. तर, धीरेंद्र शास्त्रींनी मध्यप्रदेशातून अंनिसचं चॅलेंज स्विकारलयं, परंतू, ते चॅलेंज बागेश्वर धाममध्येचं पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com