मोठी बातमी; आज मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार जरांगेंच्या भेटीला जाणार; उपोषण सुटणार?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे. सरकारने आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार हे मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत. चंद्रकांत पाटील देखिल जालन्याला जाणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. त्यामुळे आता मनोज जरांगे यांचं उपोषण सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे.