Shivsena
ShivsenaTeam Lokshahi

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टात आजचा युक्तिवाद संपला, उद्या पुन्हा सुनावणी

तीन दिवसाच्या युक्तिवादात दीड दिवस ठाकरे गट युक्तिवाद करणार तर दीड दिवस शिंदे गट युक्तिवाद करणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी चालू झाली. आठवड्यात सलग तीन दिवस घटनापीठ सुनावणी घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न देता याच खंडपीठासमोर सुनावणी चालेल, असे न्यायालयाने म्हटले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करत आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. आता तो युक्तिवाद संपला आहे. उद्या पुन्हा एकदा ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद होणार आहे.

Shivsena
श्रीकांत शिंदेंची जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप; अदित्य ठाकरे म्हणाले...

काय घडले आज?

तीन दिवसाच्या युक्तिवादात दीड दिवस ठाकरे गट युक्तिवाद करणार तर दीड दिवस शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. त्यातला आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. आज आणि उद्या ठाकरे गटाचे वकील हे युक्तिवाद करणार आहे. आज त्यांनी युक्तिवाद करताना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह विविध मुद्द्यांवरू जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आजची सुनावणी पार पडली असून उद्या पुन्हा याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com