Shivsena | Thackeray Group | Shinde Group
Shivsena | Thackeray Group | Shinde GroupTeam Lokshahi

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली; उद्यापासून नियमित होणार सुनावणी

आज कोर्टाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला.

आजपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे. आज कोर्टाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला. रेबिया प्रकरणावरुन जोरदार युक्तीवाद झाला. यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेत. रेबिया प्रकरण महाराष्ट्रासाठी लागू करता येणार नाही. असे मत मांडले. सोबतच दहाव्या सूचीनुसार आमदार अपात्र ठरायला हवे होते. असे ते म्हणाले. त्यानंतर आजची सुनावणी संपली आहे. उद्या १५ फ्रेब्रुवारीपासून याप्रकरणी नियमीत सुनावणी पार पडणार आहे.

Shivsena | Thackeray Group | Shinde Group
राणा दाम्पत्यांनीही साजरा केला व्हॅलेंटाईन डे; एकमेकांना म्हणाले...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आजचा युक्तीवाद संपला. उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे. ज्येष्ठ वकील हरिश साळवे हे उद्या युक्तीवाद करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुमारे ४ तास सुनावणी पार पडली. आज शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनु सिंघवी, वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. उद्या ( १५ फ्रेब्रुवारी ) याप्रकरणी नियमीत सुनावणी पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com