Eknath shinde| Uddhav Thackeray| Supreme Court
Eknath shinde| Uddhav Thackeray| Supreme CourtTeam Lokshahi

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली; आज दोन्ही गटाचा जोरदार युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण, बुधवारी पुन्हा सुनवाणी होणार.
Published by :
Sagar Pradhan

राज्याच्या सत्तासंघर्षांवर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. आता त्यानंतर आजची सुनावणी संपली आहे. आता उद्या म्हणजेच बुधवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

Eknath shinde| Uddhav Thackeray| Supreme Court
कंबोज यांच्या आरोपांवर जाधवांचे जोरदार प्रत्त्युतर; म्हणाले, 100...

आजचा ठाकरे गटाचा युक्तिवाद?

आजच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांकडून सर्वात प्रथम युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी ठाकरे गटाची बाजू मांडताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या विरोधात अनादर नोटीस काढावी. राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले. मविआ सरकार पाडण्यासाठी राज्यपालांच्या हालचाली होत्या. यावेळी वकील सिंघवी यांच्याकडून किहोटो केसच्या दाखल्याचं देखील वाचन करण्यात आले. 27 जूनची परिस्थिती जैसे थे हवी. प्रकरण अध्यक्षांकडे सोपवायचं असेल तर जुन्या अध्यक्षांना परत आणा असे ठाकरे गटाचे वकील म्हणाले. यावेळी त्यांनी वारंवार १० व्या सूचीतील अधिकारांचा आमदारांकडून गैरवापर झाला आहे. असे सांगण्यात आले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काय दिल्या सूचना?

लंच ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी पुन्हा सुरू झाली त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना सूचना दिल्या आणि शिवसेनेने परवापर्यन्त युक्तिवाद संपवावा, असे सांगितले आहे. याच आठवड्यात प्रकरण संपवायचं आहे. असे सरन्यायाधीश चंद्रचूड यावेळी म्हणाले.

शिंदे गटाचा युक्तिवाद?

ठाकरे गटाच्या युक्तिवादाला खोडून काढताना शिंदे गटाचे वकील कौल म्हणाले की, आमदारांनी समर्थन काढले, त्यानंतर बहुमत चाचणी करण्यात आली. आमदारांनी आधीच स्पष्ट केले होते की ठाकरे यांच्यांवर विश्वास नाही. त्यानंतर राज्यपालांनी परवानगी दिली. असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, बोम्मई केसमध्ये अपात्र आमदारांना मतदानाचा अधिकार होता. सरकार हे बहुमतात आहे की नाही हे बहुमत चाचणीतच राज्यपाल ठरवू शकतात, बोम्मई केसचा दाखला आम्हाला बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com