राजकारण
लोकशाही वृत्तवाहिनीवरील कारवाई म्हणजे माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न- टीव्हीजेए
किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.
या गुन्ह्याचा निषेध टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन करत आहे. पत्रकार मग तो दैनिकाचा असो की टीव्हीचा विविध प्रकारच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या नेहमी प्रयत्न केला जातो. हाच प्रकार कमलेश सुतार यांच्या बाबतीत झाला आहे. सदर प्रकरणी करू तेवढा निषेध कमी आहे. या प्रकरणी टीव्हीजेए संघटना ही संपादक श्री कमलेश सुतार यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे