Raj Thackeray: अभिनंदन करत राज ठाकरेंनी जरांगेंना दिला 'हा' सल्ला

Raj Thackeray: अभिनंदन करत राज ठाकरेंनी जरांगेंना दिला 'हा' सल्ला

मनोज जरागेंच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ट्विट केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ट्विट केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, 'मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा ! असं ट्वीट करुन राज ठाकरे यांनी आरक्षणावरुन प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, आरक्षण मिळाल्याच्या आनंदात राज्यभर मराठा आंदोलक दिवाळी साजरी करत आहेत. सगळीकडे फुलं उधळली जात आहेत. तर सर्वत्र गुलालाची उधळण होत आहे. त्यामुळे नेमकं आरक्षण मिळालं आहे का, नसेल मिळालं तर ते कधी मिळणार, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com