वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे 2020 लाच समजले होते; उदय सामंतांचा मोठा खुलासा

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे 2020 लाच समजले होते; उदय सामंतांचा मोठा खुलासा

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारला कोंडीत पकडले आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याला उदयोगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मविआने वेदांतासाठी सूट दिल्याची माहिती खोटी असून दोन महिन्यात कंपनी गुजरातला जाऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

उदय सामंत यांनी म्हणाले की, प्रत्युत्तर द्यायला नाही तर वस्तुस्थिती जनतेला समजली पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद घेतली आहे. ही कंपनी २ महिन्यात गेली नाही. पॅकेज दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु, ७ जानेवारी २०२० सालीच तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन कंपनी राज्यात येणार नाही असे सांगितले होते, असा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.

चार राज्य हा प्रोजेक्ट करण्यासाठी आग्रही होते. ३९ हजार कोटीचे पॅकेज महाविकास आघाडीने दिले होते. परंतु, ते दिले गेले नाही. वीज कमी दराने पाहिजे होती. ९९ वर्षाच्या करारावर जागा पाहिजे होती. पण, ६ महिन्यांत फक्त बैठका घेतल्या गेल्या. ही कंपनी येणार नाही हे जानेवारी 2020 मध्येच स्पष्ट झाले होते, असा दावा सामंतांनी केला आहे.

शिंदे सरकार आल्यानंतर फडणवीस यांनी बैठक घेत विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली. ३८,८३१ कोटीचे पॅकेज देण्याचा निर्णय करण्यात आला होता. हा प्रकल्प गेला याचे खूप दुःख आहे, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाले आहे. गेल्या आठ महिन्यात महाराष्ट्रातून हवा तो रिस्पॉन्स न मिळाल्याने वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला असल्याची पंतप्रधाननी सांगितले. परंतु, महाराष्ट्राला अजून मोठा प्रोजेक्ट देणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी दिले, असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com