वेदांतामध्ये डील झालं, चौकशी होणार? उद्योगमंत्र्याचे सूचक वक्तव्य

वेदांतामध्ये डील झालं, चौकशी होणार? उद्योगमंत्र्याचे सूचक वक्तव्य

वेदांता प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

रत्नागिरी : वेदांता प्रकल्पावरुन राज्यात घमासान सुरु असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तर, वेदांता प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याचा आरोप सातत्याने शिंदे सरकार करत आहे. अशातच उदयोगमंत्री उदय सामंत यांना वेदांताच्या बाबतीत डील झाली असून याबाबतीतले पुरावे लवकरच येतील. ते येताच संबंधितांची चौकशी करणार असल्याचा इशारा दिला आहे.

उदय सामंत म्हणाले की, महाविकास आघाडी काळात काय उद्योग झाले आहेत, याचा शोध आता शिंदे सरकार घेणार आहे. वेदांताबाबतही मविआ सरकारच्या काळात डील झाली. याबाबतीत नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्याकडे पुरावे असून त्यांच्याकडून पुरावे मिळताच संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे,

वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेला हे राज्याच्या दृष्टीने हानीकारक आहेच, पण आगामी काळात त्यापेक्षा मोठे प्रकल्प राज्यात कसे आणता येतील याबाबत रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे उद्योगाबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वेदांतानंतर रिफायनरी प्रकल्पासाठी शिंदे सरकार आग्रही असल्याचे दिसून येत आहे. नारायण राणे, उदय सामंत यांच्यासह अनेक नेते रिफायनरीच्या पाठिंब्यात उतरले असून रत्नागिरीतच प्रकल्पासाठी आग्रही आहे. काहीच दिवसांपुर्वी नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत विरोधकांनी खोडा घालू नये, अशी विनंती सुद्धा उदय सामंत यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com