'अडीच वर्षात किती प्रकल्प बाहेर गेल्याची यादीच उद्या जाहीर करणार'
अमझद खान | कल्याण : अडीत वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची उद्या मी यादीच जाहिर करणार असल्याचा गौप्यस्फोट उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी रायगड मधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाहेर जात असल्याची टिका केली होती. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योग दीड लाख रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. त्याला राज्य सरकारही त्याला मदत करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. डोंबिवली सर्टर्डे क्लबतर्फे इंजिनिअर डे निमित्त राज्य स्तरीय उद्योजकता परिषदेचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस उद्योग मंत्री सामंत हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार योजनेतंर्गत कर्ज मागणाऱ्या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणो झिरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उद्योग मंत्री सामंत यांनी दिला आहे.
'डोंबिवलीतील कारखाने स्थलांतर आणि प्रदूषणावर'
डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळा यांच्यासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात लवकर दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही उद्योजक ऐकणार नसतील परिस्थिती पाहून कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.