मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे सुरतच्या दिशेने स्थलांतर; उद्योगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे सुरतच्या दिशेने स्थलांतर; उद्योगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

हिरे व्यापारांनी सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यवतमाळ : मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे सुरतच्या दिशेने स्थलांतर; उद्योगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका! उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 70 हजार कोटी...

एक दुसरा व्यापारी या जिल्ह्यातल्या त्या जिल्ह्यात या राज्यात त्या राज्यामध्ये गेला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इंडस्ट्री तिकडे गेली अशा पद्धतीची चर्चा होते. महाराष्ट्राच्या डायमंड क्षेत्रासाठी अतिशय मोठा निर्णय हा शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतलेला आहे. मुंबईपासून जवळच नवी मुंबई येथे डायमंड हब करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डायमंड पॉलिसी देखील आम्ही केलेली आहे. मी आवर्जून आपल्याला सांगतो की एक वर्षानंतर देशातला सगळ्यात मोठा डायमंड हब हा महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला असेल आणि तो सगळ्यात मोठा असेल, असे उदय सामंतांनी म्हंटले आहे.

मराठा आरक्षणाप्रश्नी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण टिकणार दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका अनेक वेळा शिंदेंनी सांगितलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर परत कोणी बोलावं अशी अपेक्षा करणे योग्य नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com