विश्वासघात...! उदयनराजेंनी एका वाक्यात घेतला शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

विश्वासघात...! उदयनराजेंनी एका वाक्यात घेतला शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

प्रशांत जगताप | सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली. तरी राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी साताऱ्यात सांगितले होते. उदयनराजेंनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अनुभवलं आहे, असाही टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

विश्वासघात...! उदयनराजेंनी एका वाक्यात घेतला शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार
मी एकटाच राहून काय करणार होतो, त्यामुळे...; गुलाबराव पाटलांनी सांगितले शिवसेना सोडण्याचे कारण

पवार साहेब हे वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांनी मांडलेले विचार योग्यच आहेत. हे मी मान्य करतो. विश्वासघात करण्याची आमची पंरपरा नाही, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 आणि 22 मे कालावधीत यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारातून आयोजित केला गेला असल्याची माहिती आज जलमंदिर पॅलेस येथे देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com