शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला नाही; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला नाही; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

शिवसेना, काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरेंनी हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरेंनी हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला माफी देत नाही, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला नाही; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले...

उद्धव ठाकरे म्हणाले की, वाकचौरेंनी माफी मागायची गरज नाही. शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला माफी देत नाही. भाऊसाहेब चुकीने गेले होते. त्यांनी चूक केली होती पण पाप केले नव्हते. त्यांनी कधी मातोश्रीवर आरोप केले नाही, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर केली आहे. तर, मी आता ज्यावेळी शिर्डीत येईन तेव्हा साईबाबांचे दर्शन तर घेईनच पण सभाही घेईन, असेही त्यांनी म्हंटले आहे.

माझं त्या गद्दारांना आवाहन आहे की निवडणुकीला सामोर जा. मातोश्री म्हणजे मी नाही मातोश्री म्हणजे बाळासाहेब. जे पक्ष संपवायला निघालेत त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. मी लढतोय ते तुमच्या भरवशावर. शिवसेनेचा आवाज दिल्लीचं तख्त हलवल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी. मात्र, आता जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही, अशीही टीका उध्दव ठाकरेंनी केली.

तर, भाऊसाहेब वाघचौरे म्हणाले की, मी २०१९ ला लोकसभेला मी शिवसेनेमुळे निवडून आलो कालांतराने विविध पक्षात गेलो. मात्र झालेल्या चुकीबाबत मी उद्धव ठाकरे यांची माफी मागितली. पण माझातला शिवसैनिक हा कायम होता. उद्धव ठाकरेंनी पहिला प्रवेश दिला तेव्हा मी खासदार झालो. ज्या पद्धतीने समाजात शिवसेनेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. शिवसेनेला संपवायला निघालेल्यांना आता संपवायचं आहे. शिवसेनेचा आता प्रवास दिल्लीच्या तख्त्यापर्यंत न्यायचा आहे. मी आता घर वापसी केली आहे. या क्षणापासून आपल्याला शिवसेना वाढीसाठी काम करायचे आहे, असे त्यांनी म्हंटले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com