Uddhav thackeray
Uddhav thackeray Team Lokshahi

शिवसेनेसमोर नवे संकट! उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार

शिवसेना कोणाची ही लढाई सुरू असतानाच ठाकरे गटासमोर आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : शिवसेना कोणाची ही लढाई सुरू असतानाच ठाकरे गटासमोर आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आता संपत आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले आहे. यावर आता काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray
आदित्य ठाकरेंच्या बापाचं पदच घटनाबाह्य; नितेश राणेंचे टीकास्त्र

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गट व शिंदे गटात लढाई सुरु असून हा मुद्दा निवडणूक आयोगात आहे. परंतु, त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्यास अवघे बारा दिवस शिल्लक आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. यामुळे शिवसेनेत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

यावर अनिल देसाई म्हणाले, आमच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तरीही आयोगाला काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुखपदी कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Uddhav thackeray
पुण्यात एक मंत्री आलेत ते पण कोल्हापूरवरुन अन्...; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

दरम्यान, 14 फेब्रुवारीला शिवसेनेच्या पक्षाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यादरम्यान काय निवडणूक आयोग ठाकरे गटाची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com