भाजपनेही फडणवीसांचा बदला घेतला; उध्दव ठाकरेंचा टोला

भाजपनेही फडणवीसांचा बदला घेतला; उध्दव ठाकरेंचा टोला

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत बाळासाहेबांनी स्मृतीस्थळावर अभिवादन केले.

मुंबई : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत बाळासाहेबांनी स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे गट-भाजपाच्या विधानांचा समाचार घेतला. भाजपनेही फडणवीसांचा बदला घेतला. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असा मिश्कील टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, लढता लढता शिवसेना प्रमुखांनानंतर 10 वर्ष निघून गेली. त्यांच्यात जे अनेक पैलू होते त्याचं दर्शन घडवणारा एक अनुभव देणारा स्मारक उभं राहणार आहे. शिवसेना प्रमुख व्यंगचित्रकर ही ओळख ओघाने आलीच. आज ही इतर व्यंगचित्रंकारांनी काढलेली आहेत. ही चित्र उपलब्ध झाली पाहिजेत. काही जणांचं उमाळ आता बाहेर आलेली आहेत. भावना व्यक्त करताना त्याचा बाजार होऊ नये हेच माझं मत आहे. विचार व्यक्त करायला कृती लागते. नाहीतर त्याला बाजारूपणा बोलू शकतो. त्यांना साजेसं काम करा हीच भावना आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

स्मारकांचा कामात मी सुद्धा कारण नसताना मध्ये-मध्ये डोकावणार नाही. भाजपला सगळंच हवं आहे. ते त्यांना द्यायचे की नाही हे जनता ठरवेल. स्वप्न बघायला लोकशाहीत अधिकार आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या आयुष्यावर दोन चित्रपट काढले. उगाचच कौतुक करणार नाही. पण, त्यांनी बाळासाहेबांना दाखवले आहे. नाहीतर काही जण फक्त स्वतःचे कौतुक करुन घेतात, असा टोला उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. पण, ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, त्यांचा राजकारणतला डीएनए पाहावं लागेल. तेच बोलत आहेत की आम्ही हिंदुत्त्व सोडलं. ही त्यांची भावना होती. संजय राऊत हे काल जे बोलले ते योग्य बोलले. ज्यांचं तोतये हिंदुत्त्व आहे त्यांनी बोलू नये. त्यांचा मंत्री पण महिलांबद्दल उलटं सुलट बोलत आहेत ते बाळासाहेबांचे कसले विचार बोलतात, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.

तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात बदला घेतला, असे विधान केले होते. यावर उध्दव ठाकरेंनी भाजपनेही फडणवीसांचा बदला घेतला. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असा मिश्कील टोला लगावला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com