नीती आयोगाच्या आडून मुंबई वेगळी करण्याचा डाव उघड; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई : निती आयोगामार्फत मुंबईच्या विकासाचा मास्टरप्लॅन केंद्र सरकारनं सादर केल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. निती आयोगावरुन उद्धव ठाकरेंनी आज सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई वेगळी करणं किंवा मुंबई केंद्रशासित करणं डाव आता उघड झाला आहे. मात्र हा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई वेगळी करणं किंवा मुंबई केंद्रशासित करणं डाव आता उघड झाला आहे. मात्र, हा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. ज्यावेळी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात येईल तेव्हा त्यांचे पाश आम्ही तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुंबईची स्वायत्तता अबाधित ठेऊ, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच, सरकार हे सध्या गॅसवर आहेत. त्यामुळे त्यांनी सिलेंडरची किंमत कमी करणं आश्चर्याची बाब नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर मिश्किल टोला लगावला आहे.
मध्यतंरी मी बातमी वाचली की भाजपच्या आमदारांना मुस्लिम भगिनींकडून राखी बांधा, अशा सूचना दिल्या आहेत. परंतु, राखी बांधायची असेल तर बिल्कीस बानोकडून सुरू करा. माणिपूरच्या त्या भगिनींची धिंड काढली त्यांच्याकडून करून घ्या. ये पब्लिक हे सब जाणती है, असाही निशाणा त्यांनी पंतप्रधान मोदींवर साधला आहे.
इंडिया आघाडी जाहीर झाल्यापासून पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरुन भाजप सातत्याने टीका करत आहेत. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे पंतप्रधान होण्यासाठी खूप चॉईस आहेत. पण, भाजपकडे कोणती चॉईस आहे. जे 10 वर्ष आहेत त्यांचा अनुभव जनतेला आला आहे. चार राज्यांसाठी लोकसभा तेव्हाच विधानसभा घ्या याचा परिणाम नक्की दिसेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.