होय मीच बारसूची जागा सुचविली होती; उध्दव ठाकरेंची कबुली, पण त्या पत्रात लिहिलं...

होय मीच बारसूची जागा सुचविली होती; उध्दव ठाकरेंची कबुली, पण त्या पत्रात लिहिलं...

बारसू रिफानरीला आंदोलन तापले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

मुंबई : बारसू रिफानरीला आंदोलन तापले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात, बारसूतील जागा उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सुचवली असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. यावर वज्रमुठ सभेतून उध्दव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. मीच बारसूची जागा सुचविली होती. पण, तिथे पोलिस पाठवून दमदाटी करायला सांगितले नव्हते, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, 6 मे रोजी कोकणात जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

होय मीच बारसूची जागा सुचविली होती; उध्दव ठाकरेंची कबुली, पण त्या पत्रात लिहिलं...
आता यांनाच पाहण्याची वेळ आलीयं; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल, गद्दारी करून...

ही राजधानी आंदन मिळालेली नाही, लढुन मिळवलेली राजधानी आहे. एक मे रोजी साधारणपणे मध्यरात्रीपासून आपण हुतात्मा स्मारकावर रोषणाई करतो. काल आम्ही पोहचलो तोपर्यंत कोणीही सरकारकडून किंवा महापालिकेकडून तिकडे फिरकलेला नव्हता. आज सकाळी मिंधे गेले असतील. एक आपल क्रियाकर्म करायचं म्हणून दुर्मुखलेल्या चेहर्‍याने जाऊन हुतात्मा स्मारकाला मानवंदना करून आलेही असतील. हुतात्म्यांनी जर तेंव्हा संघर्ष केला नसता, लढा दिला नसता, तर आज गद्दारी करून का होईना, पण तुम्हीं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

कर्नाटकची निवडणूक रंगात आली आहे, आपल्या पंतप्रधानांनी भाषणात म्हंटलं की कॉंग्रेसने त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या. शिव्या देण्याच समर्थन करत नाही मग तुमची भोक पडलेली टिनपाट मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना रोज बोलतात त्यावर तुम्हीं का गप्प बसला? अजुनही ते ज्या भाषेत माझ्यावर बोलत आहेत त्या भाषेत माझा शिवसैनिक अजुन बोललेला नाही. संजय राऊत सुद्धा त्यांच्या भाषेत बोलत नाहीत, आम्हीं मान ठेवतो. तुमची लोक वाट्टेल ते बोलल्यावर आमची लोक सुद्धा बोलणार, बोलणारच! नुसत तुम्हीं बोलाल ते ऐकायला फक्त कानाला भोक दिलेली नाहीत, तोंड देखील दिलेलं आहे. तुम्ही त्या टीनपाटांना बुचं घाला. मग सगळे चांगले होईल. तुमची लोकं बोलली, तर आमची लोकं बोलणारच, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

बारसूबद्दल मी बोलणार आहे, आणि फक्त इकडेच नाही तर येत्या सहा तारखेला बारसूमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटुन बोलणार आहे. कस काय तुम्ही मला अडवु शकता? तो काही पाकव्याप्त काश्मिर नाही किंवा बांग्लादेश नाही. तो महाराष्ट्रातील रत्नागिरीचा भाग आहे, मी बारसूला जाणार. मी सहा तारखेला आधी बारसूला जाणार आणि त्यानंतर संध्याकाळी महाडच्या सभेला जाणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. होय, आमच्या सरकारने बारसूची जागा सुचवली होती, पण त्या पत्रात लिहिलं होत का की पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रुधुर सोडा, वेळप्रसंगी गोळ्या चालवा, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com