संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुपाऱ्या घेऊन...

संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुपाऱ्या घेऊन...

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तीनही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर टीकास्त्र सोडले. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुपाऱ्या घेऊन...
राज्याचे नेतृत्व फडणवीसांकडे; राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक,म्हणाले कटुता संपवायचीये

उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक आहे. संजय राऊत यांना मी अरेतुरे बोलतोय कारण आम्ही नेहमी असंच बोलतो. तो माझा एक चांगला मित्र आहे. कारण संकटात मित्र साथ देत असतो. न्यायालयाने जो निकाल दिला त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. ही शासकीय यंत्रणा राबत आहेत त्याला न्यायदेवतेने चपराक दिली आहे. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्याच्या अंगावर जा म्हणाले त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत आणि हे सर्व जग बघत आहे, अशी जोरदार टीका केली आहे.

संजयचं कौतुक आहे. त्याच्या आई, आमच्या वहिनी आणि त्यांची मुलगी सर्वांचं कौतुक आहे. मधल्या काळात मला राऊतांची खूप आठवण आली. तुरुंगात पण भेटायला जायला तयार होतो, असेही त्यांनी म्हंटले होते. मागची केस ही खोटी होती. परंतु, खोट्या केसेसमध्ये संजय राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

तसेच, संजय राऊतांनी मातोश्रीवर येण्यापुर्वी पुढील दोन दिवसांत देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचे म्हंटले होते. यामुळे राऊत भाजप प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, जर त्यांना मांडवली करायची असती तर तो एवढे दिवस जेलमध्ये राहीला नसता असेही ते म्हणाले. त्याला आम्ही सगळ स्वातंत्र्य दिले आहे. तो भेटणार असेल त्याला आम्ही अडवले नसते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुपाऱ्या घेऊन...
'सूर बदले बदले हैं, पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे'

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजूजू यांची गेल्या काही दिवसातील केलेली वक्तव्ये ही न्याय वृंदावर आक्षेप घेणारी आहेत. कोणीही आपल्या बुडाखाली तपास यंत्रणा घेत असेल तर आवाज उठवला पाहिजे. सरकार पाडण्यासाठी यंत्रणा वापरल्या जात आहेत. सुपाऱ्या घेऊन जर यंत्रणा काम करत असतील तर या यंत्रणा बंद का करू नयेत, असा प्रश्न जनतेला केला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता. परंतु, मी अजुनही कुठे बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे मी यात्रेला येणार नसल्याचे सांगितलं. पण, या यात्रेला शिवसेनेचा पाठींबा असेल व आदित्य ठाकरे हे यात्रेत सहभागी होणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगिततले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com