शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नाहीत, पण पक्ष फोडायला आहेत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

उध्दव ठाकरे आज नगर दौऱ्यावर असून त्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नगर : शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यासाठी पैसे नाहीत पण पक्ष फोडायला पैसे असल्याची घणाघाती टोला उद्धव ठाकरे सरकारला लगावला आहे. उध्दव ठाकरे आज नगर दौऱ्यावर असून त्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठयावर उभा असून शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर नुकसान-भरपाई द्यावी, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली आहे. कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री चार-चार दिवस झोपत नाहीत आणि मग आराम करण्यासाठी गावाकडे हेलिकॉप्टरने जातात. हेलिकॉप्टर घेऊन जरा शेतकऱ्यांच्या बांधावरही फेरफटका मारून या, इथल्या साध्याभोळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com