राजकारण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार
शिवसेना ठाकरे गटाचा आज उत्तर भारतीयांचा मेळावा ठाणे येथील गडकरी रंगयतन या ठिकाणी मेळावा होणार आहे
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचा मेळावा होणार आहे. हा उत्तर भारतीयांचा मेळावा असून यात उद्धव ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न आहे. हा मेळावा 22 जुलैला आयोजीत करण्यात आला होता. मात्र इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे तो पुढे ढकलण्यात आला.