Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

सत्तानंतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात; आनंदाश्रमात जाणे टाळले

राज्यात सुरु असलेले राजकीय डावपेच आणि सत्तांतर यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज प्रथमच ठाण्यात शिवसैनिकांच्या भेटीसाठी आले होते.

ठाणे : राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या महाआरोग्य शिबिराला भेट दिली असून त्यानंतर उद्धव ठाकरे हे टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जैन मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित झाले. परंतु, यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाण्याचे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

Uddhav Thackeray
निष्ठेच्या पांघरुणाखाली काही लांडगे घुसले होते ते विकले गेले; उध्दव ठाकरेंचा घणाघात

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत होते. सत्तातंरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात धुसफूस सुरु होती. अशातच उध्दव ठाकरे आज ठाण्यात येणार होते. परंतु, त्याआधीच आनंद आश्रम येथे बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम येथे जाण्याचे टाळले असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. सध्या जो काय विकृत्त आणि गलिच्छपणा राजकारणात आलेला आहे. आज जेवढे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहे ते सगळे ठाकरे गटात माझ्यासोबत आहेत. बाकी सगळे विकाऊ विकले गेले आणि ते काय भावात विकले गेले ते सगळ्यांनाच माहिती असल्याचा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. निष्ठेच्या पांघरुणाखाली काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही शिवसेनेची आणि महाराष्ट्राची बदनामी असल्याची खंत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com