Uddhav Thackeray Live
Uddhav Thackeray Live Team Lokshahi

Uddhav Thackeray Live Update: शिवसेना म्हणजे रस्त्यावरचा ढेकूण नाही, कोणीही येईल आणि चिरडून जाईल

थोड्याचं होणार मेळाव्याला सूरवात

तुमचे कोणते डाव पेच पूर्ण होणार नाही

अमित शहा यांना आव्हान तुमचे कोणते डाव पेच पूर्ण होणार नाही. मुस्लिम सुद्धा आमच्या सोबत, अमराठी आमच्यासोबत, मी कोरोनात सर्वांचे काम केले आहे. हीच आमची शिकवण आहे.

रक्तपात झाला तर शिवसैनिकांचा होईल

रक्तपात झाला तर शिवसैनिकांचा होईल, कमळाबाई साफ राहील हा डाव मला पूर्ण होऊ देयचा नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील हि शेवटीची निवडणूक, पण मी म्हणलं आपल्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक

मुख्यमंत्र्यांना फिरायची सवय झाली आहे

ठाणे, पारघार मध्ये मुली विकल्या जाता आहेत आणि मुख्यमंत्री फिरता आहेत.

मुंबई सांभाळली त्याची दाखल परदेशातील लोकांना घेतली

कोरोना परिस्थितीत आम्ही जशी मुंबई सांभाळली त्याची दाखल परदेशातील लोकांना घेतली, पण या कमळाबाईला काही नाही. सकाळी उठून जर हे स्वतःचा चेहरा आरश्यात बघतील तरी म्हणतील भष्ट्राचार भष्ट्राचार असे हे लोक.

मला माझ्या घराण्याचा अभिमान

आमच्यावर अनेक आरोप झाले वंशवाद, घराणेशाही असं काही. पण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत.

गदारांची लक्तरं दसरा मेळ्यात काढणार 

वेदांत गेल्यानंतर धादांत खोटे बोले, दिल्लीत मुजरा मारायला गेले. मुजरा करता पण दिल्लीला ठणकावून का नाही बोलत की महाराष्ट्रातून प्रकल्प का गेला.

मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता?

मुंबई आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही

तुम्ही जमीन दाखवा आम्ही आसमान दाखवू - उद्धव ठाकरे

मुंबईवर हक्क सांगण्याचा हट्ट करू नका, मुंबईचा कमळा बाईचा काय संबंध. मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले. गिधाडांना मुंबईचे लचका तोडू देऊ नका.

उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरवात

दसरा मेळावा आपल्या परंपरे प्रमाणे शिवतिर्थावर होणार, आजच एवढी गर्दी आहे. तर मेळाव्याला किती राहील

उद्धव ठाकरे सभास्थळावर दाखल

उद्धव ठाकरे सहकुटुंब गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ते शिवसैनिकांना संबोधित करतील.

गटप्रमुख मोठ्या संख्येने मुंबईत दाखल

मुंबईतील शाखांमधून शिवसैनिकांच्या गाड्या गोरेगाव नेस्कोसाठी निघाल्या आहेत. नेस्को सेंटरच्या गेटवर माजी मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, अनिल देसाई दाखल झाले आहेत. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुख मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. 

राष्ट्रवादी सोबतचा प्रयोग आता संपला- गजानन किर्तीकर

काही वेळातच उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरवात होणार आहे. मात्र त्या सभेआधीच शिवसेनेला गजानन किर्तीकर यांनी घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजप युती नैसर्गिक होती. राष्ट्रवादी सोबतचा प्रयोग आता संपला आहे. असे विधान त्यांनी केले आहे. ते सुद्धा या सभेला उपस्थित आहे. त्याच दरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.

मातोश्रीवरून सभेसाठी उध्दव ठाकरे रवाना

Lokshahi
www.lokshahi.com