Eknath Shinde | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Uddhav ThackerayTeam Lokshahi

'वाघाच्या डरकाळीने उत्तर...' ठाकरेंच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून 'या' दिवशी शिंदेंची खेडमध्ये सभा

याबाबत उदय सामंत यांनी ट्विटकरून माहिती दिली आहे.
Published by :
Sagar Pradhan

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे जाहीर सभा पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर सडकून टीका केली. त्यालाच उत्तर म्हणून आता शिवसेनेकडून खेडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंची सभा होताच शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर. असे देखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
"शिमग्याच्या बोंबा पुरे आता..." उद्धव ठाकरेंच्या खेड सभेवर भाजपची प्रतिक्रिया

काय म्हणाले उदय सामंत?

आज खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. आता उद्धव ठाकरेंची ही सभा होत नाही तर शिवसेनेने खेडमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत उदय सामंत यांनी ट्विटकरून माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार. अशी माहिती देत त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com