उध्दव ठाकरेंचा नवा लूक; रुद्राक्षाच्या माळांची रंगली चर्चा

उध्दव ठाकरेंचा नवा लूक; रुद्राक्षाच्या माळांची रंगली चर्चा

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तर, दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे.

नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यावेळी उध्दव ठाकरेंच्या नव्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उध्दव ठाकरेंचा नवा लूक; रुद्राक्षाच्या माळांची रंगली चर्चा
राम मंदिराच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्नं...

उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. नेहमी साध्या कुर्त्या पायजमात असणारे उध्दव ठाकरेंच्या आजच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. उध्दव ठाकरे यांनी भगवा कुर्ता घातला असून त्यावर रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या या रुद्राक्षांची माळ उध्दव ठाकरेंनी घातली आहे. तर, कपाळावर भगवा टिळा लावला आहे. या लूकमुळे उध्दव ठाकरेंनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली असून श्रीरामांचे दर्शन घेतले आहे. यावेळी उध्दव ठाकरे काळाराम मंदिरात आरती करणार आहे. तसेच, गोदावरी तीरावरही उद्धव ठाकरे आरती करणार आहेत. उध्दव ठाकरेंसोबत राऊत आणि अरविंद सावंत हेही उपस्थित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com