"...की तुम्ही कुठे पळाल" ईडी कारवाईवरुन ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

"...की तुम्ही कुठे पळाल" ईडी कारवाईवरुन ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

ईडी कारवाईवरुन ऊद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

त्यांनी पक्ष फोडला आहे, पक्ष चोरला आहे, धनुष्यबाण आपली निशाणी चोरली आहे. तरी मी जातो तिथे गर्दीच गर्दी उसळतेय. हे पाहून त्यांच्या आणखी पोटात दुखतंय. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. शिवसेनेच्या वतीने मी एकच सांगेन की नवीन समीकरण झालं त्यानंतर आपली पहिलीच निवडणूक आहे. हे नवीन समीकरण आपण चालवलं. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज मूक्ती असेल, १० रुपयांमध्ये शिवभोजन असेल, आपत्ती काळातील मदत असेल काहीही असेल आणि कोरोना काळातील संकट त्याही काळामध्ये देशामध्ये जे सर्व्हे होत होते त्या सर्व्हेमध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं. काम तुमचं होतं. आपण प्रशासन चांगलं करु शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलं. आता निवडणूक कशी विरोधकांची डिपोसीट्स जप्त करुन जिंकून दाखवून शकतो त्याची पहिली निवडणूक आहे.

याचसोबत उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूक सध्या तोंडावर आले आहेत आणि याच क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो. आता गद्दारी होऊन जवळपास दोन-एक वर्ष झाले. मी दोन वर्षात आलो नव्हतो कारण म्हटलं दोन वर्ष जाऊद्या आपल्यापेक्षा कर्तबगार असतील हे गद्दार दाखवतील दुनियेला त्यांची कर्तबगारी. जे माझ्यावर आरोप करत होते की उद्धव ठाकरे घरी बसून राहायचे, मी घरी बसून राहिलो तरी एवढे लोकं माझ्यासाठी का येतात? तुम्ही जे आता दारोदारी फिरताय सरकार आपल्या दारी तसं नाहीये. हे मिंध्या तेथे भाजपच्या दारी कटोऱ्या घेऊन जातायेत रोज. काय करायचं ते सांगतील उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि तसा करण्याल्यातला मी नाही आणि तसा नव्हतो. त्यांना इथे कठपुतलीचा गेम पाहिजे. यांच्या हातातले बाहुल्या नव्हतो आपण. सगळं काही दिलं यांना खासदारकी दिली आमदारकी दिली. आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून मध्ये 50 खोके ती गोष्ट विसरू नका. अगदी मिंध्याला सुद्धा महत्त्वाचं खातं दिलं होतं.

तसेच काहीजण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं तिकडे सांगितलं ना तुम्ही ओळखलं असेल कोण नेता ओळखले की नाही आणि सांगितलं की काय करू मी एवढं खाल्ले आता की तुरुंगात जावं लागेल आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही आणि हीच यालाच म्हणतात हूकुमशाही. 2014 पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दुप्पट करू, केलं, शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट झालं नाही पिक विमा नाही. उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आणखीन काही जनधन योजना नाही मग हे कोण बोलतंय आणि कोणी दिलं नाही. मग खोटं कोण बोलतंय भाजप बोलतंय की मी बोलतोय. जो पक्ष माझ्या 140 कोटी हे त्यांच्याच भाषेतला हा शब्द आहे 140 कोटी खोटं बोलू शकतो मग तोच माणूस त्यांचा अध्यक्ष त्यावेळी जे होते अमित शहा ते मला आता खोटं ठरवत आहेत पण अमित शहाजी तुम्हाला एकच सांगतो तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबीयांनी ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो.

मुंबईमध्ये साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे इडीवाले घुसले होते. मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा जे तुम्ही करताय ते तुमच्यावर उलटं पडेल. आम्ही जर का ठरवलं निर्णयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचे जे काही आहेत घरघड्यासारखे यंत्रणा हे तुमच्यावर आम्ही सोडले आणि तुमच्या घरातील लोकं घुसले की तुम्ही कुठे पळाल. तुम्ही आधीच सगळं गडगंज खाल्लेलं आहात तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाहीये असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com