"फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं" - उद्धव ठाकरे

"फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं" - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नेमकं निवडणूकीच्या तोंडावर जसं हेंमत सोरेनला अटक केली याचा अर्थ असा की हूकुमशाही येईल अशी भीती नाही आता हुकूमशाही आल्यातच जमा आहे. खुल्या वातावरणात निवडणुका होऊ दिल्या पाहिजेत. अनेक काही व्यक्ती आपण असेही पाहतो की ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप करुन पक्षात घेऊन त्यांच्या केसेस बंद करुन टाकल्या आणि जे लोकं बोलत आहेत त्यांच्यावर केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकले जाते. तर ही काही लोकशाही चांगली आहे असं मानण्याचं लक्षण नाही आहे. हे काही लक्षण चांगलं नाही आहे. हूकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर जातो आहोत आणि माझा महाराष्ट्र दौरा सुरु झालेलाच आहे थोडं मी हळू केलं आहे कारण निवडणूकीच्या तारखा जवळ आल्या आहेत. पण प्रचंड गर्दी मला स्वागतासाठी उभी असते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपने केलेल्या टीकेवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरचे केसेस सगळे मागे घेतले जात आहेत. आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालांना अटक झाली. कारण त्यांच्यामध्ये सर्वात मोठा लाभार्थी भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यानी अनेक आता ही बिंग फुटलं अनेक अशा कंपन्या आहेत की एकतर त्यांच्यावर धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाहीतर त्यांना रोखे मिळाल्यानंतर त्यांना करार मिळाले आहेत. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक करण्यात आली. भाजपची ही आता केवलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे. ठग ते आहेत त्यांच्यामुळे ठगो का मेला त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील सर्व ठग आता भाजपमध्ये आहेत आम्ही ठगमुक्त झालो आहोत.

देवेंद्र फडणवीस यांनी काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहून झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती, राहुल गांधी सावरकर हा सिनेमा पाहायला येत असतील मी संपूर्ण थिएटर बूक करेन आणि त्यांना एकट्याला हा सिनेमा पाहण्याची व्यवस्था करेन असं फडणवीस म्हणाले होते त्यालाच आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं. फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन. त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा असा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com