Uddhav Thackeray : दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती?
जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संध्याकाळी मी जालन्याला जात आहे. काल जो काही शासकीय अत्याचार झाला. नुसते आता निषेध करुन चालणार नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात ताशेरे मारलेले आहेतच आणि सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर एक फुल, दोन हाफ आहेत पण कोणाकडेही वेळ नाही आहे की राज्यात आंदोलन सुरु आहे. लोक उपोषणाला बसली आहे.
तुम्हाला इंडियाच्या विरुद्ध बोलायला वेळ आहे पण ज्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे त्या ठिकाणी एकाही मंत्र्याला जावेसे वाटलं नाही. एक फुल, दोन हाफ मधले कुणीही गेलं नाही. आता चौकशी करणार. आम्ही काहीच केलं नाही . जे झालं त्याची सखोल चौकशी करु. अजून किती खोल जाणार तुम्ही. एवढं खोल जाणार की वरतीच येणार नाही तुम्ही. प्रत्येक मुख्यमंत्री, गृहमंत्र्याला राज्यात काय सुरु आहे याची कल्पना रोज दिली जाते. या एक फुल, दोन हाफला माहित नव्हते हे आंदोलन सुरु आहे ते? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.