भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा; उध्दव ठाकरेंचा घणाघात
मुंबई : भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचा मेळावा आज रंगशारदा येथे पार पडला. यावेळी उध्दव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागले. शिवसेना भाड्यावर चालत नाही तर शिवसेना निष्ठेवर चालते. ज्यावेळी माझे वडील चोरावे लागतात त्यावेळी तुमची मला किव येते, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.
आमच्याकडं शिक्षण आणि वयानुसार अनेक चेहरे आहेत. पण, त्यांच्याकडे एकच चेहरा आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि सुभाष भाई यांचा चेहरा वापरावा लागत आहेत. त्यांचे आशीर्वाद होते म्हणून ते हिंदुह्रिदयसम्राट आहेत. ज्यावेळी माझे वडील चोरावे लागतात त्यावेळी तुमची मला किव येते. बाळासाहेबांनी विरोध जरूर केलं. पण, बाळासाहेबांनी कमलाबाईची पालखी वाहण्याचे ठरवले नव्हते, असे उध्दव ठाकरेंनी म्हणाले आहेत.
आमच्या नेत्यांना त्रास दिला जातो आहे. किशोरी ताई, अनिल परब, संजय राऊत यांच्यावर कारवाई करता, आमच्या लोकांना धमक्या देता. सर्व ठीक आहे तुमचे पण दिवस आतमध्ये जायचे येणार आहेत. ही मशाल नाही आग आहे. थोडे दिवस राहिले आता शाप घेऊ नका. पुण्य तर होणार नाही पण शाप घेऊ नका, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.
मी मुख्यमंत्री होतो तेव्हा 3 वेळा नीती आयोगाची बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मला कधी मुंबईचा विकास दिल्लीद्वारे करण्याचा प्रस्ताव नव्हता दिला. उलट त्या अधिकाऱ्यांनी सांगितले होतं आमचा फायदा करून घ्या. मिंधेना मुंबईचे महत्व माहिती नाही. मुंबई खत्म केली कि आम्ही केंद्रशासित करायला मोकळे. मुंबई ते हातात घ्यायला निघाले पण कोणी किती प्रयत्न केले तरी आम्ही ते होऊ देणार नाही, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.