कसब्यात मविआची बाजी; उध्दव ठाकरेंचा निशाणा, भाजपविरोधात मतदान...

कसब्यात मविआची बाजी; उध्दव ठाकरेंचा निशाणा, भाजपविरोधात मतदान...

भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. यावर विरोधी ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. यावर विरोधी ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोटनिवडणूक जिंकले याचा आनंद आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

कसब्यात मविआची बाजी; उध्दव ठाकरेंचा निशाणा, भाजपविरोधात मतदान...
विरोधकांचा देशद्रोही म्हणून उल्लेख; मुख्यमंत्र्यांचे भाष्य, हा गुन्हा असेल तर मी पुन्हा करेन

पोटनिवडणूक जिंकले याचा आनंद आहे. जर कसबा इतक्या वर्षानंतर बाहेर पडू शकतो. तर देश देखील बाहेर पडू शकतो. आगामी काळात देखील महविकास आघाडी बघायला मिळू शकेल. भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे हेच दिसत आहे. भाजपला जोपर्यंत गरज होती तोपर्यंत वापर केला. टिळकांचा देखील त्यांनी वापर केला आणि आता सोडून दिले. गिरीश बापट यांचा फोटो पाहिला ऑक्सिजन नळ्या लावून आणले होते. पर्रिकर यांचे देखील असेल केले, त्यांच्या मुलाला संधी दिली नव्हती, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल दिलासादायक आहे. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया बदलली पाहिजे. बेबंदशाही रोखण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आजचा निर्णय स्वागतार्ह आहे. निवडणूक आयोगावर आता किती विश्वास ठेवायचा हे ठरवावे लागेल. सर्वोच्च न्यायालयात जी केस सुरू आहे त्यावर देखील याचे परिणाम उमटतील. आमचा विधानसभेत एक पण सदस्य नव्हता, बाकी लोकांचे पण एक सदस्य आहेत तर ते म्हणू शकत नाही की पक्ष आमचाच. निवडणूक आयोगावर दबाव असेल तर बघावे लागेल. आमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालय आहे पण आज त्या आशेला अंकुर फुटले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केल्याने संजय राऊत यांच्यावर हक्कभंग नोटीस आणली आहे. याबाबत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, त्यांना मी बोलावेन आणि विचारेन की नेमके त्यांना काय म्हणायचे होते. तसे मुख्यमंत्री यांनी देखील सांगावे देशद्रोही कोणाला बोलले. जर विरोधकांबाबत नव्हते कोणाबाबत होते, कोणाला चहा पानाला बोलावण्यात आले होते हे त्यांनी सांगावे, असे त्यांनी विचारले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसंदर्भात बोलताना उध्दव ठाकरे यांनी आमची युती झाली आहे. त्यामुळे अश्या भेटीगाठी होत राहणार. आम्ही हुडी वगैरे घालून भेटत नाही. दिवसा ढवळ्या भेटतो, असा टोला शिवसेना-भाजपला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com